भावना ट्रस्ट वाणिज्य व विज्ञान महाविद्यात मराठी वाङ्मय मंडळ व ग्रंथालय विभागा अंतर्गत २७फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन‘ म्हणून साजरा करण्यात आला.
कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्टाची साहित्य संस्कृती ,मराठी भाषा यासाठी अनमोल योगदान दिले आहे. श्री. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व मराठी भाषेतील लेखक व त्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यातील योगदान जाणून घ्यावे व विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वाला चालना मिळावी ह्या हेतूने महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून ‘मराठी साहित्यिकांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीचे योगदान‘ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आली होते. महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा सिंघम यांच्या अध्यक्षते खाली चर्चासत्राची सुरवात करण्यात आली. महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन मराठी भाषेतील अनेक थोर साहित्यिकांच्या साहित्याविषयी चर्चा करून त्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यातील योगदान सांगण्यात आले.
महाविद्यालयातील प्रा. प्रमोदिनी काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील प्रा. रुपाली सिनकर , प्रा. शैलेश आरौदेकर, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल यमुना गोरडे यांनी केले. प्रा. अंकिता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.